भाई बेर्डे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST2021-03-23T04:34:08+5:302021-03-23T04:34:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार व रत्नागिरीतील व्यापारी पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

भाई बेर्डे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार व रत्नागिरीतील व्यापारी पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते ९२ वर्षांचे होते.
शहरातील राधाकृष्ण नाका येथील बेर्डे स्टोअर्सचे मालक व रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे निधन झाले. समाजवादी विचारसरणीचे भाई बेर्डे बॅ. नाथ पै यांचे अनुयायी तसेच प्रा. मधू दंडवते यांचे जवळचे सहकारी होते. त्यांना आणीबाणीच्या काळात तुरूंगवासही झाला होता.
काही वर्षे ते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच देवरूख येथील मातृमंदिर संस्थेचे ते काही काळ अध्यक्षही होते. रत्नागिरी नगर परिषदेत ते दोनवेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. अनेक सामाजिक लढायांमध्ये नेतृत्व करणारे समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आज हरपल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा, सुना असा परिवार आहे.