शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वीज मंडळाच्या नळजोडण्या तोडल्या, रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:03 IST

रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवीज मंडळाच्या नळजोडण्या तोडल्या, रत्नागिरी नगर परिषदेची कारवाईमहावितरण सहकार्य करत नसल्याची भूमिका

रत्नागिरी : वीज पुरवठ्यातील अनंत समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महावितरण कंपनी रत्नागिरी नगर परिषदेला सहकार्य करीत नाही. त्यामुळे चूक महावितरणची व त्रास नाहक नगर परिषदेला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महावितरण सहकार्य करीत नाही तर नगर परिषदही महावितरणला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका घेत रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.याबाबत नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. पंडित म्हणाले, रत्नागिरी शहरात रहाटाघर येथे गेल्या चार वर्षामध्ये विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, हे उपकेंद्र कधी सुरू तर कधी बंद अशी स्थिती आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.मात्र, कंत्राटदाराने चांगले काम केले नाही. त्यामुळे हे उपकेंद्र सातत्याने बिघाडाच्या चक्रात अडकले आहे. त्याचा परिणाम शहरातील विद्युत पुरवठ्यावर होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. शहरातील पथदीप बंद राहात आहेत, असे ते म्हणाले.बदला घेणार ?सहकार्य न करणाऱ्या वीज मंडळाला असहकार्य करीत मंडळाच्या नळजोडण्या तोडल्या आहेत. त्यामुळे अशीच कारवाई वीज मंडळही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शीळ येथील पाणी योजनेचा वीज पुरवठा आधीच खंडित होतो. हा पुरवठा बंद केला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकेल.नळजोडणी तोडलीनगर परिषदेने शहरातील रहाटाघर उपकेंद्राची नळपाणी जोडणी कापली आहे. नाचणे येथील वीज मंडळाच्या प्रमुख कार्यालयाची २ इंची नळजोडणीही तोडण्यात आली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरीWaterपाणीmahavitaranमहावितरण