शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलिसाच्या कुटुंबावर बहिष्कार, रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:23 IST

लग्न, जलदान विधी आणि शोकसभेवरही वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील हर्चे बौद्धवाडी येथील रहिवासी निवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक गंगाराम पवार यांच्यासह कुटुंबाला वाडीतील लोकांनी वाळीत टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पवार कुटुंबाच्या लग्न, जलदान विधी आणि शोकसभेवरही वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. याबाबत पवार यांनी लांजा पोलिसांकडे धाव घेतली असून, कारवाईची मागणी केली आहे.मुंबईतील हर्चे ग्रामस्थ बौद्धजन मंडळाने घर फोडल्याचा आरोप पवार यांचे मोठे बंधू गोविंद पवार यांनी केला होता. त्याचा राग मनात ठेवून संपूर्ण वाडीने त्यांना बहिष्कृत केल्याचे म्हटले आहे. पवार बंधू हर्चे ग्रामस्थ बौद्धजन मंडळ, मुंबईचे सभासद आहेत. पवार कुटुंबीयांनी वाडीतील बुद्धविहार बांधताना साडेतीन लाख रुपयांचे पाणी बांधकामाला दिले. त्याचे कोणतेही बिल त्यांनी घेतलेले नाही, तसेच या मंडळाने बुद्धविहार बांधकामासाठी फंड उभारणीस पावत्याही छापल्या होत्या. त्यासाठी घेण्यात आलेल्या पैशाची पावतीही पवार यांना दिलेली नाही.दरम्यान, पवार यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाला बौद्ध मंडळासह वाडीतील भावकी व इतर ग्रामस्थांना निमंत्रित केले होते. त्यामध्येही वाडीतील कोणीही सहभागी झाले नाही. बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रणही देण्यात आले नाही, तसेच वाडीतील कोणत्याही सभेला बोलावले जात नाही, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. हर्चे ग्रामस्थ बौद्धजन मुंबई व इतर लोकांनी एकत्रित येऊन जातपंचायत निर्माण करून पवार कुटुंबाला वाळीत टाकल्याचे अशोक पवार यांनी म्हटले आहे. वाडीतील काही ग्रामस्थांनी ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पवार यांनी लांजा पोलिसांकडे केली आहे.

ग्रुपमधून रिमूव्हपवार यांचे पुतणे अनिरुद्ध गोविंद पवार याने वडिलांच्या जलदान विधी आणि शोकसभेचा संदेश व्हाॅटस्ॲप ग्रुपवर पाठविला होता. त्यानंतर तत्काळ पवार यांचा मुलगा आकाश, पुतण्या अनिरुद्ध, मनोज यांना त्या ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले.

भावकी संघटनेचे सहकार्य नाहीमुंबईतील मंडळातील पदाधिकाऱ्याने ग्रुपवर संदेश टाकून जे सभासद भावकी संघटनेचे नियम पाळणार नाहीत, अशा सभासदांच्या कोणत्याही सुख-दु:खाच्या कार्यक्रमात भावकी संघटनेचे सहकार्य राहणार नाही, असा निर्णय सर्व सभासदांच्या सहमतीने घेण्यात आल्याचे व्हाॅटस्ॲप ग्रुपवर पाठविला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस