शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

देवगड हापूस आंब्यांची पेटी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत; ६ डझनाची पेटी पाठवण्याचा प्रकाश शिर्सेकर यांना मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:41 IST

हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला सोमवारी रवाना केली आहे. या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.

पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली.

लक्ष्मीपूजनाला विक्री

वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनीमार्फत ही हापूस आंबा पेटी  पाठविण्यात आली असून, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंब्याची विक्री होणार आहे. लक्ष्मीपूजनाला आंबा विकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीच्या दलालांनी सांगितले.

पेटीला विक्रमी भाव मिळेल

कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिलेच बागायतदार ठरले असून, उद्याच्या विक्रीदरम्यान या पेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Devgad Hapus Mangoes Arrive in Mumbai for Diwali; Shirsekar Honored

Web Summary : Devgad's Prakash Shirsekar sends first Hapus mango box to Mumbai for Diwali. Early flowering care led to this initial harvest, expected to fetch a record price at Vashi market during Laxmi Pujan.
टॅग्स :alphonsoहापूस आंबाAlphonso Mangoहापूस आंबा