शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीचा दुसरा बोगदाही खुला, शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:46 IST

खेड (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी ...

खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले झाल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.बोगद्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.दोन्ही बोगद्यांत कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ केव्ही क्षमतेच्या विजेची मागणी केली आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याची सूचना महावितरणने केली होती. मात्र, अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत साशंकता होती.मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यांत जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याने दोन्ही बोगद्यांतून वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही बोगदे कार्यान्वित झाले असले तरी अजूनही काही कामे अपूर्ण आहेत.शिमग्यासाठी घाईमार्चअखेरपर्यंत दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शिमगोत्सवासाठी कोकणाकडे येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते. त्यामुळे लगबगीने दोन्ही बोगदे सुरू करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग