बेपत्ता जवान राजेंद्र गुजर यांचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: July 9, 2017 09:25 IST2017-07-09T09:25:50+5:302017-07-09T09:25:50+5:30
अरूणाचल प्रदेशमधील पापुम पारे जिल्ह्यात बचावकार्यात सहभागी झालेल्या वायुदलाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड

बेपत्ता जवान राजेंद्र गुजर यांचा मृतदेह सापडला
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 9 - अरूणाचल प्रदेशमधील पापुम पारे जिल्ह्यात बचावकार्यात सहभागी झालेल्या वायुदलाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालवणी-जांभुळनगर येथील फ्लाईट इंजिनियर सार्जंट राजेंद्र
यशवंत गुजर ( २९) हे बेपत्ता झाले होते. काल शनिवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला. आज त्यांच्या मूळ गावी पालवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजेंद्र गुजर यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे . पूर आणि भुस्खलनात अडकलेल्या 169 लोकाना जीवदान देणाऱ्या या
हेलिकॉप्टरलाच अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील तिघांचे मृतदेह या पूर्वीच हाती लागले
रत्नागिरीचे सुपुत्र गुजर यांचा शोध चौथ्यादिवशी लागलाआहे . त्यांचा मृतदेह सापडल्याने कुटुंबाच्या सर्व आशा संपल्या आहेत.