रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST2021-09-16T04:38:46+5:302021-09-16T04:38:46+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे वाडा वेसरोड येथे आरंभ ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. चिपळूण तालुक्यातील ...

रक्तदान शिबिर
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे वाडा वेसरोड येथे आरंभ ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर मेडिकल कॉलेज, सावर्डे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यासाठी डॉ. प्रताप शेट्ये आणि रवी अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
गौरीचे ओवसे उत्साहात
दापोली : तालुक्यातील बुरोंडी गोमराई गावामध्ये गौरीचे ओवसे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम झाला. गौराईचे आगमन होताच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. या महिलांनी गौरीची पूजा करून कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे, असे गाऱ्हाणे घातले.
उद्बोधक कार्यशाळा
दापोली : दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ आणि महाविद्यालय वार्षिकांक प्रकाशन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लिहिते व्हा, लेखक बनण्याच्या दृष्टीने अग्रेसर पाऊल या विषयावर उद्बोधक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रंथपाल कीर्ती परचुरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
तिकीट तपासणी सुरू
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत जवळपास २५३ फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा बसावा, यासाठी कोकण रेल्वे मार्गाच्या स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये कसून तिकीट तपासणी केली जात आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी गर्दी नियंत्रण सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी आरसीएफ कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.