शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:33 IST

रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गळ्यात फलक बांधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देमोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी भाजपचे आंदोलनजनावरांच्या गळ्यात फलक बांधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध

रत्नागिरी : रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गळ्यात फलक बांधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.१५ दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील मोकाट जनावरे आणि उनाड श्वानांचा बंदोबस्त करा, अन्यथा जनावरे पकडून कार्यालयात सोडू, असा इशारा देण्यात आला होता. मुख्याधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही मोकाट जनावरांचा आणि श्वानांचा त्रास रत्नागिरी शहरातील नागरीकांना सहन करावा लागत आहे.

जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी उदासीन असल्यामुळे भाजप रत्नागिरी शहरातर्फे सोमवारी शहरभर रस्त्यात ठाण मांडुन बसलेल्या जनावरांच्या गळ्यात अकार्यक्षम लोकप्रनिनिधी आणि प्रशासन यांचा जाहीर निषेध असल्याचे फलक अडकविण्यात आले.तसेच मारुतीमंदिर येथे भाजपा शहर कार्यकर्त्यांनी जनतेच्या हिताची कामे करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, रत्नागिरी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नगर परिषद प्रशासन आणि कारभाऱ्यांनी मोकाट जनावरे आणि उनाड श्वान यांच्यावर तीव्र मोहीम राबवून बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. हे आंदोलन करताना राजीव कीर, भैया मलुष्टे, प्रशांत डिंगणकर, अशोक वाडेकर, ययाती शिवलकर, बंड्या भाटकर, मनोज कीर, ज्योतीप्रभा पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी