शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख नगरपंचायतीमध्ये फुलले भाजपाचे कमळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:13 IST

देवरूख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत.

 रत्नागिरी - देवरूख नगर पंचायत निवडणुकीत अनपेक्षितरित्या भाजपने बाजी मारली असून, नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. देवरूखमध्ये नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला पराभूत करून भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या.प्रत्येकी १७ जागांसाठी देवरूख आणि गुहागर नगर पंचायतीसाठी बुधवारी मतदान झाले होते. आज गुरूवारी मतमोजणी झाली. देवरूखमध्ये नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला पराभूत करून भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या. १७पैकी आठ जागा भाजप, रिपब्लिन पार्टी आॅफ इंडिया आणि मनसे आघाडीने जिंकल्या आहेत. त्यातील सात जागा भाजपने तर एक जागा मनसेने जिंकली आहे. शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. एक अपक्ष उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत. भाजपला विरोध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले तरीही त्यांना एक मत कमी पडणार आहे. उपनगराध्यक्ष, विषय समिती निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवाराचे मत ज्यांच्या बाजूला झुकेल त्यांनाच ही पदे मिळतील.

दुसरीकडे  गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासह सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र शहर विकास आघाडी आणि शिवसेनेने हात मिळवणी केल्याने राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. गतवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली. शिवसेनेचाही एकच उमेदवार निवडून आला असला तरी शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचे ९ उमेदवार निवडून आले आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे राजेश बेंडल हे शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. येथे भाजपला विजयाची मोठी आशा होती. मात्र भाजपला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.

गुहागर नगर पंचायतीत शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १७पैकी केवळ एकच जागा जिंकता आली असल्याने हा माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव यांना जोरदार धक्का मानला जात आहे. रत्नागिरीत एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपली जागा राखली आहे.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी