शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: मंत्री परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी निघालेल्या सोमय्यांना पोलिसांनी कशेडी घाटातच रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 16:07 IST

नोटीस स्वीकारल्यानंतरही ते दापोलीत जाण्यावर ठाम होते.

रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोलीत आले आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह हॉटेल व्यावसायिकांनी विरोध केल्याने वातावरण तापले आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात किरीट सोमय्या येताच पोलिसांनी त्यांना तेथे रोखले आणि नोटीस बजावली.हे रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतून चक्क हातोडा घेऊनच दापोलीकडे रवाना झाले. मात्र, या त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला आहे. त्यांना दापोलीतच रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनीही सोमय्या यांना विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडण्याची शक्यता आहे.दरम्यान, दुपारी सोमय्या कशेडी घाटात येताच पोलिसांनी त्यांना तेथे रोखले व नोटीस बजावली. सोमय्या यांनी ही नोटीस घेतली मात्र त्यावर सही केली नाही. ही नोटीस स्वीकारण्यासाठी पोलिसांनी विनंती केल्यानंतरच त्यांनी ही नोटीस स्वीकारली. पण त्यावर सही करण्यास नकार दिला. ही नोटीस स्वीकारल्यानंतरही ते दापोलीत जाण्यावर ठाम होते. त्यानंतर ते कशेडी घाटातून खेडकडे रवाना झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीKirit Somaiyaकिरीट सोमय्याAnil Parabअनिल परब