शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाची माळ भाजपकडे

By admin | Updated: June 13, 2014 01:34 IST

देवरूखमध्ये हालचाली : मुदत संपणार असल्याने चर्चा

देवरुख : नव्याने नगरपंचायतीची निर्मिती झालेल्या देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पहिला मान सेनेला मिळाला आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची सव्वा वर्षांची मुदत आता संपत आली असून युतीमध्ये यापूर्वी झालेल्या तडजोडीनुार हे पद भाजपला देण्याचे ठरवण्यात आले होते. आता यानुार सव्वा वर्षांच्या टर्मसाठी देवरुखात नगराध्यक्षपदाची माळ भाजपच्या गळ्यात पडणार का? याकडे साऱ्या देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. देवरुख ग्रामपंचायतीचे देवरुख नगरपंचायतीत रुपांतर डिसेंबर २०१२ मध्ये तर मार्च २०१३ मध्ये या नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली आणि १ एप्रिल रोजी याचा निकाल लागला. पूर्वीच्या ग्रा.पं.मधील सत्ताधाऱ्यांना आणि दिग्गजांना चितपट करत शिवसेना व भाजप युतीने निर्विवाद सत्ता खेचून आणली. नगरपंचायतीच्या या पहिल्याच निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी १२ जागा युतीने पटकावल्या. यामध्ये सेनेचे ७ तर भाजपचे ५ नगरसेवक आहेत. यामुळे जास्त नगरसेवक त्यांनाच पहिले नगराध्यक्षपद असे ठरवण्यात आले. यानुसार नगरसेविका निलम हेगशेट्य यांना नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. तसेच देवरुखच्या पहिल्या महिला नगराध्यक्षपदाचा सन्मानही त्यांच्याकडेच जातो तर त्यावेळी उपनगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदी भाजपचे निलेश भुरवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळीच सव्वावषार्नंतर पद कोणाला द्यायचे याबाबत ठरविण्यात आले होते. त्यानुसार पुढील सव्वा वर्षात भाजपला हे पद देण्याचे ठरविण्यात आले. नगराध्यक्षपदाची माळ भाजपच्या गळ्यात पडते का यागडे देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या अलिखित ठरावानुार विद्यमानांना राजीनामा द्यावा लागणार असून त्यानंतर ही निवड जुलै महिन्यात शक्य होवू शकेल. दोन पक्षांच्या अंतर्गत चर्चेच्या माहितीनुसार भाजपच्या गटातून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत स्वाती राजवाडे व मेधा बेर्डे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. आता या निवडीकडे देवरुखवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप पदाबाबत ्आशावादी आहे.(प्रतिनिधी)