भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:15 PM2019-09-23T17:15:32+5:302019-09-23T17:22:19+5:30

भाजपकडे सध्या भुंगे, पाखरे आकर्षित होत आहेत. या भूमीवर पिश्चर प्लॅन्ट वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या सुगंधाने भुंगे आकर्षित करते, भुंगे बसले की, आपल्या पाकळ्या बंद करून घेते आणि बसलेल्या भुंग्यांचा नायनाट करते. ही पिश्चर प्लॅन्ट वनस्पती म्हणजेच भाजप आहे. ही भारतीय जनता पार्टी आलेल्या कार्यकर्त्यांचे रक्त शोषून घेऊन दोन वर्षांत यांना फेकून देणार आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी लांजा येथे केले.

BJP attracts eyebrows, Vijay Bhosale alleges | भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप

भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप लांजा येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

लांजा : भाजपकडे सध्या भुंगे, पाखरे आकर्षित होत आहेत. या भूमीवर पिश्चर प्लॅन्ट वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या सुगंधाने भुंगे आकर्षित करते, भुंगे बसले की, आपल्या पाकळ्या बंद करून घेते आणि बसलेल्या भुंग्यांचा नायनाट करते. ही पिश्चर प्लॅन्ट वनस्पती म्हणजेच भाजप आहे. ही भारतीय जनता पार्टी आलेल्या कार्यकर्त्यांचे रक्त शोषून घेऊन दोन वर्षांत यांना फेकून देणार आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी लांजा येथे केले.

लांजा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी बहुद्देशीय सभागृह लांजा येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. यावेळी विजय भोसले हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या देशात भाजपचे सरकार आहे. या भाजपमध्ये भगवे लोक मुख्यमंत्री होत आहेत. याआधी तुम्ही कधी पाहिले आहे का ? बेटी पढाओ... बेटी बचाओ... म्हणणारे हे पंतप्रधान यांच्या नाकाखाली दोन बलात्कार होतात. त्यामध्ये यांचेच लोक आहेत. त्यांच्यावर हे कारवाई करत नाहीत. हा सर्व भंपकपणा आहे, याची चीड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आली पाहिजे. या रागाचा बदला घेतला पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी लांजा तालुकाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, राजापूर तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर, अ‍ॅड. सदानंद गांगण, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महिला तालुकाध्यक्षा धनिता चव्हाण, शहर अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, विश्वास चौगुले, अकबर नाईक, सुरेश साळुंखे, बाप्पा पाटोळे, शांताराम गाडे, बंडोपंत जाधव, नाना सप्रे, बब्या हेगिष्ट्ये, मनोहर पाटोळे, राजाराम गुरव, सुचित्रा गांधी, राजू राणे, अ‍ॅड. राहुल देसाई, प्रकाश लांजेकर, राजापूरचे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शरफू काझी उपस्थित होते. यावेळी शिल्पा कांबळे हिची काँग्रेस पक्षाच्या युवा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले.

निष्ठेने पक्षात राहा

काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निष्ठेने राहिले पाहिजे. संघटनेशी निष्ठा असली पाहिजे संघटनेचे जे नेतृत्व आहे त्यांच्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, पक्षाबरोबर काही झाले तरी निष्ठा असली पाहिजे. आम्ही गेली ३५ वर्ष काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत, आम्ही कधीच निष्ठा सोडली नाही, असेही यावेळी विजय भोसले म्हणाले.

 

Web Title: BJP attracts eyebrows, Vijay Bhosale alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.