राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:42 IST2020-04-18T17:40:45+5:302020-04-18T17:42:16+5:30
राजापूर : तालुक्यातील दळे गावातील सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासे वाडी येथील सहा ते सात जणांना कोल्ह्याने चावा ...

राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा
राजापूर : तालुक्यातील दळे गावातील सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासे वाडी येथील सहा ते सात जणांना कोल्ह्याने चावा घेत जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
सकाळी सव्वा सहा ते आठ यादरम्यान मार्गी तळे येथील दर्शना देविदास भोसले, गिरकरवाडी येथील प्रभाकर जनार्दन गिरकर, धरणवाडी येथील महेंद्र अंकुश लासे, लासेवाडी येथील नयना नारायण तांबे, कला पांडुरंग पाटील, नारायण परशुराम तांबे आणि बागेत काम करणाऱ्या एका नेपाळी युवकाला कोल्ह्याने चावा घेत जखमी केले आहे. हे सर्व लोक आपापल्या घराशेजारी कामे करत असतानाच पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला करून जखमी केले.
जखमी झालेल्या सर्वांना वीरेंद्र चव्हाण, नरेश गिरकर, राजेंद्र प्रसाद राऊत आदींनी तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यावर व्यावसायिक वैभव कुवेस्कर याने तत्काळ राजापूर वनविभाग कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.
वनाधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय रणधीर, वनपाल सदानंद घाडगे, वन कर्मचारी विजय म्हादये घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील लक्ष्मीकांत पालकर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करून जबाब घेण्यात आले.