गुहागर : ५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डोडवली कांबळेवाडी येथील ५५ वर्षीय महिला एकटीच आपल्या शेतामध्ये सोमवारी सकाळी ९ वाजता काम करत होती. यावेळी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पाईपलाईनचे काम करण्यासाठी आलेला टुनटुनकुमार हा तिच्याकडे वाईट नजरेने पहात होता व फिर्यादीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता.यावेळी या महिलेने घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी टुनटुन कुमार याने पाठलाग करुन गाठले व झाडीझुडपात पाहुन बलात्कार केला. यानंतर या महिलेच्या अंगावरील साडीनेच तोंड व गळ्याला गुंडाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला व हाताने मारहाण करुन बेशुद्ध झालेल्या या महिलेच्या अंगावर झाडी झुडपांच्या फांद्या तोडून टाकल्या, असे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक शेलार व उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस करीत आहेत.
बिहारी कामगाराचा गुहागरात महिलेवर बलात्कार ; संतप्त ग्रामस्थांचा तहसिलदारांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:29 IST
५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारी कामगाराचा गुहागरात महिलेवर बलात्कार ; संतप्त ग्रामस्थांचा तहसिलदारांना घेराव
ठळक मुद्देठार मारण्याचाही केला प्रयत्न महिन्याभरापूर्वी एक महिला बेपत्ता झाल्याचीही तक्रार