शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळुणात भोंदूबाबासह दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले

By संदीप बांद्रे | Updated: June 25, 2024 19:23 IST

चिपळूण : गेली दीड वर्षे शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबासह दोघांना येथील पोलिसांनी दोन  महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले ...

चिपळूण : गेली दीड वर्षे शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबासह दोघांना येथील पोलिसांनी दोन  महिलांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश बाबुराव वायकर (५०, रा.मुदखेडा, जामनेर, जळगांव), अशोक देवराम जोशी (४०, रा.वावडी, जामनेर, जळगांव) अशी पकडलेल्या दोघां भोंदूबाबांची नावे आहेत. भोंदूबाबा गणेश वायकर व त्याचा साथीदार अशोक जोशी हे दोघेजण गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमधील मार्कडी येथील रश्मी पॅलेस समोरील कुंजवन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत भोंदूगिरी करीत होते. याची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यातील एक महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली. या दोघांकडे आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुमच्यावर करणी केलेली आहे. ही करणी दूर करण्यासाठी ३० हजार रुपये लागतील तर व्यवसायात यश येण्यासाठी दीड लाख रुपये लागतील सांगितले. या प्रकाराने ही महिला अवाक झाली. यानंतर तिने याची माहिती आपल्याला मैत्रिणीला सांगितली. यानुसार दुसरी महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली आणि तिने देखील आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुम्हाला यश येण्यासाठी ५० हजार रुपये लागतील. तुम्ही पैसे घेऊन या, तुमचं काम करून देतो, असे सांगितले. हा प्रकार वेगळाच असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांनी चिपळूण पोलिस ठाण्यात आले आणि पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी कुंजवन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबूसारखे साहित्य रचून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा भोंदूबाबा किचन रूममध्ये त्याच्या सहकाऱ्यासह बियर प्राशन करत होता. बियरच्या बाटल्या तेथेच आढळून आल्या. या प्रकाराबाबत पोलिसांनी खडसावले असता दोघांनीही बियर प्यायल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले आणि वैद्यकीय तपासणी करिता कामथे रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत फिर्यादीचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस