शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधव यांचा बाजार उठवणार, नीलेश राणेंचे भर सभेत टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:34 IST

दगडाला उत्तर कशाने देऊ ते बघाच

गुहागर : नारायण राणे माझं दैवत आहे, राणेंसाठीच मी जिवंत आहे. भास्कर जाधव तुम्ही राणे कुटुंबीयांच्या विरोधात वैर घेतले आहे, जेवढा कुडाळ मतदार संघात खर्च करणार तेवढाच गुहागर विधानसभा मतदारसंघातही खर्च करणार व तुम्हाला घरी पाठवणार, नीलेश राणेच तुमचा बाजार उठवणार, अशा शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी शृंगारतळी (ता. गुहागर) येथील सभेत आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी गुहागर मतदारसंघातील शृंगारतळी येथे नीलेश राणे यांच्या सभेचे आयाेजन केले हाेते. या सभेत नीलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेचा समाचार घेतला.

नीलेश राणे म्हणाले की, नातू कुटुंबीयांनी हा मतदारसंघ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. मात्र, भास्कर जाधव यांनी या मतदारसंघाची वाट लावली. या मतदारसंघाला अजून किती लुटणार आहात? पाच टक्के दिल्याशिवाय येथील कुठलेही कंत्राटी काम सुरू होत नाही, असा आराेप राणे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, राणे कुटुंबीय कधीच स्वतःहून काेणाच्या वाकड्यात जात नाहीत आणि जर काेणी आमच्या वाकड्यात गेला तर त्याला सोडत नाहीत, असा इशाराही दिला. भास्कर जाधव यांची चिपळूणची भाईगिरी याच राणेंनी संपवली होती, असेही ते म्हणाले.राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांना साधे राज्यमंत्रिपदही दिले नाही, अशी यांची परिस्थिती आहे. भास्कर जाधव यांच्यामुळे मला आज तोंड खराब करावे लागले असे सांगून दी एंड पण नीलेश राणेच करणार, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप कुरूतडकर, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, केदार साठे, प्रशांत शिरगावकर, परिमल भोसले, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनीही भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका करत निषेध केला.

दगडाला उत्तर कशाने देऊ ते बघाचगुहागर येथील सभेसाठी येत असताना चिपळूण येथे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर नीलेश राणे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. याला उत्तर देताना दगडांच्या बदल्यात तुम्हाला काय देईन ते पुढे बघा, असा इशारा राणे यांनी दिला. यापुढे कुठेही राणे कुटुंबाविराेधात तोंड उघडले तर तेथे जाऊन अशाच प्रकारे सभा घेऊन त्याचा समाचार घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणNilesh Raneनिलेश राणे Bhaskar Jadhavभास्कर जाधव