शिवसेना महिला शहर आघाडीतर्फे भास्कर जाधव यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST2021-07-14T04:36:50+5:302021-07-14T04:36:50+5:30
चिपळूण : महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिपळुणात ...

शिवसेना महिला शहर आघाडीतर्फे भास्कर जाधव यांचा सन्मान
चिपळूण : महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिपळुणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडल्याने येथील शिवसेना महिला शहर आघाडीतर्फे आमदार जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्षा ऐश्वर्या घोसाळकर, माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान सदस्य धनश्री शिंदे, महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली शिंदे, तालुका समन्वयक श्रद्धा घाडगे, उपशहरप्रमुख अर्चना कारेकर, विभाग प्रमुख अमिता कानडे, अनामिका हरदारे, तृप्ती कासेकर, राणी महाडिक, रविशा कदम, निधी सूर्वे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
----------------------------------
आमदार भास्कर जाधव यांचा सन्मान करताना माजी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ऐश्वर्या घोसाळकर व महिला शहर आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
130721\1328-img-20210713-wa0018.jpg
शिवसेना महिला शहर आघाडीतर्फे आमदार भास्कर जाधव यांचा सन्मान