भरणेत सेनेची राष्ट्रवादीवर मात

By Admin | Updated: January 31, 2015 00:01 IST2015-01-31T00:00:43+5:302015-01-31T00:01:42+5:30

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : यंत्रात बिघाडामुळे मतमोजणीला सहा तास विलंब

Bharateat Senate beat the nationalist | भरणेत सेनेची राष्ट्रवादीवर मात

भरणेत सेनेची राष्ट्रवादीवर मात

खेड : तीन मंत्र्यांनी प्रचारात सहभाग घेतल्याने अटीतटीच्या झालेल्या भरणे जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार महिपत पाटणे १३१ मतांनी विजयी झाले आहेत. खेडची आमदारकी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याकडे असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यातच एका मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे ते दुरुस्त करून अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत सहा तास विलंब झाला. तोपर्यंत कार्यकर्ते तेथेच ताटकळत उभे असल्याने प्रक्षोभ निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.
मतमोजणीदरम्यान सकाळी १०.३० वाजता शिवसेनेच्या पाटणे यांना राष्ट्रवादीच्या पांडुरंग पाष्टे यांच्यापेक्षा कमी मते मिळाल्याचा समज झाल्याने राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य सचिन दळवी आणि विनायक निकम यांनी पाष्टे विजयी झाल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे आनंदलेल्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सवच सुरू केला. मात्र, १० मिनिटांतच दळवी आणि निकम यांनी पुन्हा मतमोजणी केंद्रामध्ये जाऊन मतांची बेरीज केली आणि पाष्टे हे पराभूत झाल्याचे सांगण्यास सुरुवात केली. तोपर्यंत महिपत पाटणे १३१ मतांनी निवडून आल्याची माहिती पुढे आली.

Web Title: Bharateat Senate beat the nationalist