दापोली : दापोली नगर पंचायतीच्या प्रशासनाविरोधात नगर पंचायतीच्या गेटसमोर ठिय्या मांडत मनसे कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे भजन आंदोलन केले. जागे व्हा, जागे व्हा, नगर पंचायत प्रशासन जागे व्हा, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात उपोषण केले.दापोली शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेने अनोखे आंदोलन केले. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला शहरातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, सत्ताधारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध विषयांवर मनसेने आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेने शहरातील विविध प्रश्न हाताळण्यास सुरूवात केली आहे.
दापोलीत मनसेने केले नगर पंचायतीसमोर आगळेवेगळे भजन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:49 IST
Dapoli Nagar Panchayat- दापोली नगर पंचायतीच्या प्रशासनाविरोधात नगर पंचायतीच्या गेटसमोर ठिय्या मांडत मनसे कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे भजन आंदोलन केले. जागे व्हा, जागे व्हा, नगर पंचायत प्रशासन जागे व्हा, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात उपोषण केले.
दापोलीत मनसेने केले नगर पंचायतीसमोर आगळेवेगळे भजन आंदोलन
ठळक मुद्देदापोलीत मनसेने केले भजन आंदोलनस्थानिक प्रश्नांबाबत नगर पंचायतीसमोर आगळेवेगळे आंदोलन