रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:06+5:302021-06-01T04:24:06+5:30
चिपळूण : रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून चुलत भावाला जबर मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील बोरगाव ...

रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याने मारहाण
चिपळूण : रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून चुलत भावाला जबर मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी राजेश विकास साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव साळुंखेवाडी येथील रस्ता कोरोना संसर्गामुळे फेरीवाल्यांसाठी बंद करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी सीताराम बाजी साळुंखे यांनी आपला भाऊ राजेश याला रस्त्याबाबत जाब विचारला. फेरीवाल्यांसाठी रस्ता बंद करताना, आमच्या घराचा विचार का केला नाही, असे विचारल्याने बाचाबाची सुरू झाली. रागाच्याभरात राजेश याने थेट हातात काठी घेऊन फिर्यादी यांना जोरदार मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली असून, त्यानुसार राजेश विकास साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.