शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 14:35 IST

स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते

विनोद पवार

राजापूर : राजन साळवी.. कोकणची वाळवी, एवढी माणसे कशाला राजन साळवीच्या मैताला अशी घोषणाबाजी करत आज बारसू प्रकल्प विरोधकांनी चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरच राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा उध्दार केला. साळवी यांनी काही दिवसापुर्वीच प्रकल्पाचे समर्थन केले होते. मात्र, पुन्हा आपली भूमिका बदलून ते प्रकल्प विरोधात उभे राहिले आहेत. असे असतानाच सोलगाव फाट्यावर प्रकल्पविरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. रिफायनरी प्रकल्प बारसु येथे होण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राला पत्र दिल्यानंतर स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते. तर दुसरीकडे खासदार विनायक राउत हे सातत्याने प्रकल्पाच्या विरोधात होते. मात्र मागील आठवड्यात बारसुचे आंदोलन पेटल्याने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर पुन्हा आमदार राजन साळवी यानी यु टर्न घेत आपली भुमिका बदलली होती. यानंतर त्यांनी पुन्हा प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. मात्र त्यांचा सध्याचा विरोध हा दबावातूनच असल्याची चर्चा सुरु आहे.उद्धव ठाकरेंनी आज, बारसु दौऱ्यावर येत असताना रस्त्यातमध्ये सोलगाव फाट्यावर काही प्रकल्प विरोधकांची भेट घेत चर्चा केली. यावेळी उपस्थित प्रकल्प विरोधकांनी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Salviराजन साळवी