शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचवला शाळा सुट्टीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:23 IST

राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर घोंघावनाऱ्या ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रायगड, पालघर, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याला ५ रोजी सुट्टी जाहीर केली. रात्री ८.३०च्या सुमारास सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी, पालकांपर्यंत सुट्टीचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपमुळे पोहोचला. त्यामुळे ९९ टक्के विद्यार्थी सुटीमुळे घरी थांबले.

ठळक मुद्दे रात्री ८.३०च्या सुमारास सुट्टी जाहीर केल्यामुळे सुट्टीचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपमुळे पोहोचला९९ टक्के विद्यार्थी सुटीमुळे घरी थांबलेशाळेत सोडणाऱ्या चालक, शिक्षक - पालक संघाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रथम संदेश

मेहरून नाकाडे रत्नागिरी : राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर घोंघावनाऱ्या ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रायगड, पालघर, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याला ५ रोजी सुट्टी जाहीर केली. रात्री ८.३०च्या सुमारास सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी, पालकांपर्यंत सुट्टीचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपमुळे पोहोचला. त्यामुळे ९९ टक्के विद्यार्थी सुटीमुळे घरी थांबले. अवघा एक टक्का विद्यार्थी सकाळी शाळेत पोहोचले. तत्पूर्वीच अध्यापकवर्ग शाळेत उपस्थित होता. त्यांनी शाळेला सुटी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना घरी पाठवले.सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस होता. सकाळच्या व दुपारच्या सत्रातील शाळा दैनंदिन कामकाजानंतर वेळेवर सोडण्यात आल्या. ओखी वादळाचा प्रभाव असल्यामुळे सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी पाऊस झाला.

किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहात होते. मंगळवारी दिवसभर वादळाचा परिणाम राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली. मात्र, सुट्टी रात्री ८.३०च्या सुमारास घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत संदेश कसा पोहोचवावा, याबाबत मुख्याध्यापक, शिक्षकांनी चर्चा केली.शहरातील अनेक विद्यार्थी रिक्षा, व्हॅन, स्कूलबसव्दारे शाळेत येतात. त्यांना शाळेत सोडणाऱ्या चालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. अनेक शिक्षकांकडे त्या चालकांचे नंबर असल्यामुळे चालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपग्रुपवर प्रथम संदेश टाकण्यात आला. त्यानंतर बहुतांश शाळेत शिक्षक - पालक संघ आहेत.

प्रत्येक वर्गातील पालकाची निवड संघावर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक - पालक संघाच्या ग्रुपवर प्रथम संदेश देण्यात आला. पालकांच्या प्रतिनिधींनी शालेय सूचनांसाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपवर पालक प्रतिनिधींनी संदेश पाठवला. त्यामुळे रात्री ९ ते ९.३० पर्यंत बहुतांश पालकांना सुट्टीचा संदेश देण्यात आला. अनेक पालकांनी माहितीच्या शिक्षकांना विचारून खात्री करून घेतली.

अनेक शैक्षणिक संस्थांच्या आस्थापनांनी शाळा, महाविद्यालयांच्या सूचना फलकावर सुट्टीची नोटीस रात्रीच लावली होती. शिवाय वॉचमनला रात्रीच कल्पना दिली होती. शहरातील अनेक शाळा महाविद्यालये सकाळच्या सत्रात भरतात. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येणारे आहेत. अनेक गावात मोबाईल पोहोचले असले तरी काही गावातील मोबाईल रेंज गायब आहे.

टीव्हीमुळेही अनेकांना सुट्टीची माहिती मिळाली होती. परंतु उर्वरित एक टक्क्यामध्ये जे विद्यार्थी आले त्यांच्यासाठी शाळेतील शिक्षकवर्ग सकाळी ६.३० वाजल्यापासून शाळेत उपस्थित होता. प्रवेशव्दारावर उभे राहून विद्यार्थ्यांना सुट्टीचे सांगून घरी पाठविण्यात आले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाOckhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी