शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सहाय्यक आयुक्तांकडून कारवाईस टाळाटाळ

By admin | Updated: October 31, 2015 22:28 IST

राजिवड्यात मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष

रत्नागिरी : बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी करुन राजिवडा बंदरात आलेल्या नौकेबाबत माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक आयुक्त भादुले यांच्याविरोधात पारंपरिक व छोट्या मच्छिमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नेट विरोधात मच्छिमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयावर मोर्चा काढून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून पर्ससीन नेट विरोधात मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मोर्चातील मच्छिमारांना सामोरे जाताना भादुले यांनी बेकायदेशीर मच्छीमारी झाल्यास मच्छिमारांनी तत्काळ संपर्क साधल्यास त्या बंदरामध्ये आपले अधिकारी पोहचून कारवाई करतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन केवळ दोन दिवसांतच पोकळ ठरले असल्याची प्रतिक्रिया राजिवडा येथील मच्छिमारांनी दिली. आज सकाळी राजिवडा बंदरामध्ये एक पर्ससीन नेट नौका मासेमारी करुन बंदरात आल्याचे मच्छिमारांना समजताच त्यांनी भादुले यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. यावेळी मच्छिमारांनी संबंधित नौकेवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, भादुले यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन ही कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यांनी मच्छिमारांना दिलेले आश्वासन पाळले नाही. राजिवडा बंदरामध्ये मत्स्य विभागाचा एकही अधिकारी पाठवला नाही. मत्स्य विभागाकडूनच पारंपरिक मच्छिमारांची गळचेपी सुरु असल्याचे मच्छीमार नेते खलील वस्ता व बशीर फणसोपकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)