शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 1:14 PM

 Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या ( जून 2020 ) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवडयांमध्ये जिल्हयात सरासरी ८०८.२ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हयात सरासरी पावसाचे प्रमाण अधिकजिल्ह्यात सरासरी 55.81 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी : जिल्हयात यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून गेल्या वर्षाच्या ( जून 2020 ) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आतापर्यंत नोंदला गेला आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवडयांमध्ये जिल्हयात सरासरी ८०८.२ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिमी पावसाची नोंद झाली होती.गेल्या ३ आठवडयात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिमी नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिमी पाऊस नोंदला गेला होता.पावसाची तुलनात्मक आकडेवारी खाली प्रमाणे आहे. यात कंसातील आकडे मागील वर्षीचे आहेत. आकडे मिलिमिटर मध्ये आहेत.मंडणगड ७२६ (४६३.३२), दापोली ५३०.६ (५६०.६९), खेड १११९.३ (४६४.१२), गुहागर ९३३.५ (६५८.७), चिपळूण ७५२.७ (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ (७२७.१), रत्नागिरी ९३१ (७१८.८), लांजा ७२५.६ (६६७.४) आणि राजापूर ६५८.५ (७६९.२५).जिल्हयातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्हयात ६२१.८३ मिमीच्या सरासरीने ५५९६.४४मिमी पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिमीच्या सरासरीने ७२७२.२० मिमी अर्थात १६९५.७६ मिमी सरासरी पाऊस अधिक आहे.जिल्ह्यात सरासरी 55.81 मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात 24 तासात सरासरी 55.81 मिमी तर एकूण 502.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 81.30 मिमी , दापोली 33.20 मिमी, खेड 46.90 मिमी, गुहागर 61.40 मिमी, चिपळूण 62.90 मिमी, संगमेश्वर 57.50 मिमी, रत्नागिरी 42.00 मिमी, राजापूर 42.10 मिमी,लांजा 75.00 मिमी. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी