शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:32 IST

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी ...

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांत चार घटना अशा घडल्या की, त्याचा आधार घेत काही ठराविक लोक हिंदू समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या घटना घडल्या त्यात मी कोणाला पाठीशी घातले आहे का, कोणावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांना फोन केला आहे का, हे तपासा. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी असे काही पुरावे दिले, तर मी राजकारण सोडेन. अन्यथा अशा लोकांनी बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे, असा सणसणीत इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात गायीचा अवयव सापडला, आंदोलन झाली. एका मुलीबाबत काही गैरप्रकार घडला, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाप्रसंगी गोंधळ झाला. कोणत्याही वाईट किंचा चुकीच्या कृत्याचे समर्थन मी कधीही करणार नाही. या चार घटनांमध्ये काही ठराविक लाेक मलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू समाजामध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.एमआयडीसीमध्ये जो काही प्रकार घडला त्याबाबत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. महिलेबाबतच्या प्रकरणात खरेतर पोलिसांचा अहवाल आतापर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. आठ -दहा दिवसांत तोही स्पष्ट होईल. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाबाबतही मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे कार्यालय २५ मे २०२३ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. ते मी मंजूर केलेले नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

..तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का?संघाच्या पथसंचलन प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्यात शुभम साळवी याच्यासह सात ते आठ माझेच सहकारी आहेत. माजी नगरसेवक मुसा काझी हेही माझ्या पक्षाचे आहेत. जर मी यात हस्तक्षेप केला असता, तर माझ्याच लाेकांवर गुन्हे दाखल झाले असते का, असा प्रश्न सामंत यांनी केला. लाठीहल्ल्याचा आदेश कोणाचा होता, याची चौकशी करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. त्याला मी पूर्ण सहमत आहे. खरोखरच हे शोधून काढा, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत