शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत तरुणावर तलवारीने वार, मित्राशी झालेल्या वादातून हल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 19:23 IST

हल्ला नेमका का व कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

रत्नागिरी : शहरानजीकच्या क्रांतीनगर येथे एका तरुणावर तलवारीने पाच वार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र शिवाजी विटकर (२७, रा. क्रांतीनगर) असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दाेघे हल्लेखाेर दुचाकीवरुन आले आणि त्यांनी राजेंद्रवर वार केले. या दाेघांचा शाेध पाेलीस घेत आहेत.राजेंद्र याच्यावर हा हल्ला नेमका का व कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ला करणाऱ्याचे नाव सांगितल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेंद्रची तब्येत चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.सोमवारी दुपारी राजेंद्र आणि त्याच्या मित्राची वादावादी झाली होती. या वादावादीमुळेच हा हल्ला झाला आहे का, याचा तपास आता पोलीस घेत आहेत. शहरातील क्रांतीनगर भागात तरुणावर तलवारीने वार झाल्याची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला काेणी केला, याची चर्चा शहरातील नाक्या नाक्यावर सुरु हाेती.ही घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, प्रभारी शहर पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. आरोपीला पकडण्यासाठी तत्काळ हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी