शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 7:44 PM

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली.

रत्नागिरी - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. सोबतच आता रोगराई पसरु नये, याची खबरदारी घेतली जात आहे. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना तातडीची मदत प्रशासनाने दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.जुलै  महिन्याच्या प्रारंभी पावसामुळे चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून भेंदवाडी गाव वाहून गेले होते. यासह आतापर्यंत २८ व्यक्तींचा पूरात मृत्यु झाला आहे. इतर अपघातात एकजण मरण पावला एकूण २९ पैकी पात्र ठरलेल्यांची संख्या २४ असून त्यापैकी  २२ जणांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत पुरविण्यात आली आहे. या पावसात १५९ जनावरे वाहून गेली तर ७६३ घरांचे नुकसान झाले आहे. सर्व मालमत्तेचे आतापर्यंत झालेले नुकसान १० कोटी २८ लाख रुपये  असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.जिल्हयात ३ मोठी धरणे असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत तसेच ४६ लघूप्रकल्प असून ते सर्व सुरक्षित आहेत. मृदसंधारण अंतर्गत १६ धरणे असून त्यापैकी ९ पूर्णपणे सुरक्षित असून असुरक्षित वाटणाºया ७ प्रकल्पातील पाणीसाठा कमी करुन त्यांनाही या पातळीवर आणण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.पुरानंतर आजार पसरण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय सुरु आहेत. याबाबत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. चिपळूण, खेड तसेच  रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.पावसाळ्यातील आपत्ती काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण केंद्रातून अहोरात्र (२४ तास) परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या सर्व काळात महसूल, पोलीस तसेच इतर यंत्रणांनी उत्तम काम केले असून त्यांचे आपण कौतुक करतो, असे  जिल्हाधिकारी यांनी सांगितले. महामार्ग बंदची समस्यायंदाच्या पावसाळयात चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आल्याने १० वेळा तर खेड जवळ जगबुडी नदीला पूर आल्याने १३ वेळा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पूराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक ११ वेळा बंद झाली. जगबुडीची नदीची पातळी ९.५ मीटरपर्यंत वाढल्याची नोंद या काळात झाली. २०१६ साली याठिकाणी सर्वाधिक ११.३ मीटर  पातळीची नोंद झाली होती. जमिनींना भेगासतत मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठया प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यात २६ ठिकाणी जमिनीला भेगा गेल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी