जमिनीच्या वादातून मारहाण, चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:38+5:302021-03-24T04:29:38+5:30

चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथे जमिनीच्या वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील ऊर्फ लक्ष्मण ...

Assault on land dispute, crime against four | जमिनीच्या वादातून मारहाण, चौघांवर गुन्हा

जमिनीच्या वादातून मारहाण, चौघांवर गुन्हा

चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथे जमिनीच्या वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील ऊर्फ लक्ष्मण कातुर्डे (३५), सरस्वती मनोहर कातुर्डे (५०), संजय चंद्रकांत शिगवण (३८), सरस्वती रघुनाथ इचले (४५ सर्व रा. शिगवणवाडी- खेर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री ८.१५ वाजता घडली.

याबाबत विनायक शंकर कनावजे (५३ रा. शिगवणवाडी खेर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जमिनीविषयी जुन्या वादावरून सुनील कातुर्डे, सरस्वती कातुर्डे, संजय शिगवण आणि सरस्वती इचले या चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा व नातेवाईक हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. त्यामुळे चिपळूण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत विनायक कनावजे जखमी झाले आहेत.

Web Title: Assault on land dispute, crime against four