शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मान्सूनपूर्व पाऊस सुरू होताच रत्नागिरी जिल्हा प्रशासन झाले अलर्ट, आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 15:07 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस सुरू होताच जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सजग झाला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस सुरू होताच जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सजग झाला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व तहसील विभाग, नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये आता आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सुरू झाली आहेत. ४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया संपताच याला अधिक गती येणार आहे.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आपल्या कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारीसाठी दोन दिवसांपूर्वीच आढावा बैठक घेतली होती. यावेळी विविध विभागप्रमुख उपस्थित होते. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असल्याने जिल्हाधिकारी यांनी या अनुषंगाने विविध विभागप्रमुखांच्या विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. २०११ ते २०२३ या कालावधीत झालेला सरासरी पाऊस, आपत्तींचा पूर्वानुभव, पूर प्रवण, दरड प्रवण गावे, रासायनिक कारखाने, धोकादायक कारखाने आदींबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. विविध विभाग तसेच तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभाग, बंदर विभाग आदी महत्त्वाच्या विभागांना त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अनुषंंगाने भूस्खलन, दरडग्रस्त, पूरप्रवण भागातील नागरिकांच्या दृष्टीने विशेष सतर्क राहून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य होण्याच्या दृष्टीने सर्व साहित्य आणि साधनांची सज्जता ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी सिंह यांनी या यंत्रणांना दिले आहेत. ४ जून रोजी मतमाेजणी प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच दक्ष राहणार आहे. जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने मदतकार्यासाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.

  • जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांची संख्या : २०६
  • दरड कोसळण्याचा धोका असलेले घाट : ८
  • दरड कोसळणारी घाटांची ठिकाणे : १३

जिल्ह्यात साहित्याची सज्जता

  • पर्जन्यमापक यंत्रे : १३०
  • सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली : ४०५
  • पोर्टेबल तंबू : २०
  • लाईफ जॅकेट : ८७०
  • लाईफ बोट : १४६
  • रोप अँड रेस्क्यू कीट : ५
  • पोर्टेबल एलईडी लाईटनिंग सिस्टीम : ४२
  • फायबर व रबर बोटी : १०
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस