चिपळूण पोलिसांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:53+5:302021-06-24T04:21:53+5:30

अडरे : परिचारिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तीन दिवसात गजाआड करणाऱ्या चिपळूण पोलिसांचे कौतुक केले जात आहे. एकता महिला गाव ...

Appreciation of Chiplun police | चिपळूण पोलिसांचे कौतुक

चिपळूण पोलिसांचे कौतुक

अडरे : परिचारिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तीन दिवसात गजाआड करणाऱ्या चिपळूण पोलिसांचे कौतुक केले जात आहे. एकता महिला गाव समिती कापसाळ व चिपळूण पंचायत समिती सभापती रिया कांबळे यांनीही पोलीस स्थानकात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आणि या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सर्वांचै कौतुक केले.

चिपळूणचे पोलीस निरीक्षक पोळ यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल करून चांगली कामगिरी केल्याचे उद्गार त्यांनी काढले. अशीच कामगिरी करून गुन्हेगारी नियंत्रणात ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सचिन बारी, देवेंद्र पोळ यांनी रिया कांबळे यांचे आभार मानताना, आपल्यासारख्या व्यक्तींनी केलेल्या कौतुकामुळे आम्हाला निश्चित प्रोत्साहन मिळून मनोधैर्य वाढले आहे, असे उद्गार काढले.

यावेळी रिया कांबळे यांच्यासोबत सचिन साडविलकर, राहुल कांबळे, एकता महिला गाव समिती, कापसाळ अध्यक्ष स्वाती साळवी, उपाध्यक्षा मंजुषा साळवी, सचिव भूमी खेडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Appreciation of Chiplun police