शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कंत्राटी शिक्षक कार्यमुक्त, थकीत मानधनाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:33 IST

रत्नागिरी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ...

रत्नागिरी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४५४ कंत्राटी शिक्षकांवर नियुक्ती रद्दची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या शिक्षकांना ३० एप्रिल रोजी कार्यमुक्त करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त पदांची संख्या १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाहांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय २३ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ४५४ बीएड, डीएड बेरोजगांराना रोजगार मिळाला होता. त्यांना १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णयही शासनाने घेतला होता, तसेच त्याचा फायदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना झाला, तसेच शैक्षणिक समतोल राखण्यास मदत मिळाली.या कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीनंतर पहिल्या चार महिन्यांचे मानधनच दिलेले नाही. त्यामुळे या थकीत मानधनासाठी कंत्राटी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागली आहे. हे मानधन कार्यमुक्त होण्यापूर्वी त्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कंत्राटी शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक