चिपळूणमध्ये सापडला दुसरा ऐतिहासिक मैलाचा दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:55 IST2021-05-29T17:54:30+5:302021-05-29T17:55:46+5:30
history Ratnagiri : दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड म्हणजे माईलस्टोन येथे आढळला आहे.

चिपळूणमध्ये सापडला दुसरा ऐतिहासिक मैलाचा दगड
चिपळूण : दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड म्हणजे माईलस्टोन येथे आढळला आहे.
मराठीमध्ये एक महत्वाची खूण म्हणून मैलाचा दगड असा शब्दप्रयोग केला जातो. असाच एक मैलाचा दगड चिपळूण शहरातील पेठमाप विभागात आढळला आहे. त्याचे संवर्धन व्हावे व हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात यावा असे मत इतिहासप्रेमी मंदार आवले यांनी केले आहे.
शहरातील पेठमाप विभागात हा त्रिकोनाकृती मैलाचा दगड आवले यांना आढळला आहे. त्या दगडाच्या डाव्या बाजूला चिपळूण, तर दुसऱ्या बाजूला गोवळकोट २ असे इंग्रजीमध्ये कोरलेली अक्षरे आहेत. पेठमाप मधून मुरादपूर -वाणीआळी कडे तसेच ज्या ठिकाणी श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी शेरणे काढते त्या मार्गावर हा दगड आढळून आला आहे.
हा दगड आढळल्यानंतर मुंबई येथील चंदन विचारे हे मुंबईमध्ये सापडलेल्या ब्रिटिशकालीन मैलांच्या दगडावर अभ्यास करीत आहेत. तसेच दुबईस्थित चिपळूणमधील रहिवासी मार्तड माजलेकर यांनाही या आधी चिपळूण शहरातील गांधी चौक येथे असाच एक मैलाचा दगड आढळला होता. त्यांना या दगडाची माहिती दिली गेली आहे.