शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दापोली नगरपंचायत देशात दुसरी, राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 23:23 IST

दापोली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष उल्का ताई जाधव परवीन ताई शेख यांच्या कारकिर्दीत दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते

ठळक मुद्देदापोली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष उल्का ताई जाधव परवीन ताई शेख यांच्या कारकिर्दीत दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते

दापोली (शिवाजी गोरे )

रत्नागिरी - राष्ट्रीय जल पुरस्कार-2020ची आज घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. तर, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील 'सुर्डी ग्रामपंचायत' पश्चिम विभागात तिसरी आली आहे.    दापोली नगरपंचायतीने लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात केली होती दापोली नगरपंचायतचे तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या संकल्पनेतून श्रमदान व लोकसहभागातून नारगोली धरणातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यामुळे दापोली शहर टँकर मुक्त शहर बनवून दापोली नगरपंचायतीने पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात केली होती. दापोलीतील जनतेने लोकसहभागातून राबवलेल्या या मोहिमेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्याचे फलित म्हणून दापोली नगरपंचायतीला 2020 चा राष्ट्रीय पातळीवरचा जल पुरस्कार जाहीर झाला आहे. 

दापोली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष उल्का ताई जाधव परवीन ताई शेख यांच्या कारकिर्दीत दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. त्यामुळे या शहराची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकली. दापोली नगरपंचायतीने राबवलेल्या या मोहिमेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याने दापोली नगरपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdapoli-acदापोलीbarshi-acबार्शी