शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधीक्षकांच्या निवृत्तिवेतनावर टाच

By admin | Updated: August 22, 2015 00:24 IST

पंपखरेदी प्रकरण भोवले : विभागीय चौकशी सुरू केल्याची जंगटे यांची माहिती

रत्नागिरी : आवश्यकता नसतानाही केलेली कृषी पंप खरेदी तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांना चांगलीच भोवली असून, त्यांचे निवृत्तिवेतन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची विभागीय चौकशीही सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक एम. के. जंगटे यांनी दिली. रत्नागिरीत कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी सहसंचालक एम. के.जंगटे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता दोन ते तीन अश्वशक्तीचे कृषी पंप आवश्यक असताना पाच अश्वशक्तीच्या अकराशे पंपाची आॅर्डर एमईडीसी कंपनीला दिल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. अकराशे पंपासाठी अडीच कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला होता. शेतकऱ्यांची मागणी नसतानाही मागवलेले हे पंप जिल्हाभरातील तालुका कृषी कार्यालयांच्या गोडावूनमध्ये पडून आहेत. हे पंप स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. हे वृत्त सर्वांत प्रथम ‘लोकमत’नेच दिले. पन्नास टक्के अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या पंपाची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी नकार दर्शविल्यामुळे भरणे शक्य नसल्याचे सध्याचे प्रभारी कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी कळविले. तसेच आॅर्डरही रद्द केली. त्यामुळे तत्कालीन कृषी अधीक्षक सी. एस. गायकवाड यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पंप उतरवून घेण्यात आले आहेत, ते खराब झाले तर त्याची भरपाईची रक्कमही संबंधित अधिकाऱ्यांकडूनच वसूल केली जाईल, असेही जंगटे यांनी सांगितले. यावेळी सहसंचालक जंगटे यांनी जिल्ह्याच्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा, जिल्हा परिषद कृषी अधिकारी पी. एन. देशमुख, आयडब्ल्यूएमपीचे प्रकल्प अधिकारी देसाई, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)