लांजात भाजपकडून आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST2021-08-26T04:33:28+5:302021-08-26T04:33:28+5:30

लांजा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर मुक्तता झाल्याने तसेच त्यांच्यावरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे भाजपच्या वतीने ...

Anandotsav from BJP in Lanjat | लांजात भाजपकडून आनंदोत्सव

लांजात भाजपकडून आनंदोत्सव

लांजा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर मुक्तता झाल्याने तसेच त्यांच्यावरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे भाजपच्या वतीने बुधवारी एस.टी. बसस्थानकासमोर फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रात्री उशिरा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्याबद्दल लांजा तालुका भाजप व शहर भाजपच्या वतीने बुधवारी दुपारी २ वाजता लांजा बसस्थानकासमोर जोरदार घोषणाबाजी करून फटाके वाजवण्यात आले. यावेळी अनुसूचित जातीचे प्रदेश सदस्य भाई जाधव, जिल्हा सचिव हेमंत शेट्ये, तालुकाध्यक्ष महेश (मुन्ना) खामकर, प्रभारी वसंत घडशी, शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नगरसेवक संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, ओबीसी शहराध्यक्ष अशोक गुरव, उपाध्यक्ष वासुदेव राणे, बावा राणे, बाबा लांजेकर, विशू जेधे, बावा सुर्वे, अनिल कांबळे, शेखर सावंत, रमाकांत सावंत, अनिल सुर्वे, बन्सी गांधी, विजय कुरूप, मयू शेड्ये, बाबू गुरव, प्रवीण सुर्वे उपस्थित होते.

Web Title: Anandotsav from BJP in Lanjat