आनंद आंबेकर यांची बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 14:04 IST2020-11-21T14:02:19+5:302020-11-21T14:04:07+5:30
college, educationsector, mumbiuniversity, ratnagirinews रत्नागिरी शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर सलग चौथ्यावर्षी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर नियुक्ती होणारे रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. आनंद आंबेकर हे एकमेव सदस्य आहेत.

आनंद आंबेकर यांची बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर निवड
रत्नागिरी : शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर सलग चौथ्यावर्षी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर नियुक्ती होणारे रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. आनंद आंबेकर हे एकमेव सदस्य आहेत.
वर्षभराच्या कार्यक्रम नियोजन संदर्भात कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या समवेत ऑनलाईन सभा झाली असता, डॉ. आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी युथ फेस्टिव्हल, अविष्कार संशोधन फेस्टिव्हल, विद्यार्थी संसद, विद्यार्थी वेल्फेअर कार्यक्रमांचे बजेट मांडून सभेत त्याविषयी चर्चा करण्यात आली आणि ठराव मंजूर करण्यात आले.
विद्यापीठाच्या उच्च स्तरावर नियुक्ती झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. आनंद आंबेकर यांचे अभिनंदन केले आहे.