शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जमीन वादातून वृद्ध आईवर मुलाने केला कोयतीने वार, रत्नागिरीतील मालघर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 12:29 IST

इतकेच नव्हे तर पतीसह सुनेनेही केली मारहाण

चिपळूण : वृद्ध आईवर मुलाने कोयतीने वार केला असून, यात ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२१) घडली. इतकेच नव्हे तर पतीसह सुनेनेही तिला मारहाण केली. या तिघांवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्ताराम वाजे, अजय दत्ताराम वाजे, अनघा अजय वाजे (सर्व रा. वाजेवाडी-मालघर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सुलोचना दत्ताराम वाजे (७०, रा. वाजेवाडी - मालघर) यांनी दिली. सुलोचना वाजे यांचे पती दत्ताराम वाजे, मुलगा अजय वाजे व सून अनघा वाजे यांच्यात मालघर येथील नवीन घराच्या मालकी हक्कावरून वाद आहेत. दत्ताराम, अजय व अनघा वाजे हे तिघेजण वडिलोपार्जित घरामध्ये राहतात. सुलोचना वाजे या घराच्या शेजारी बांधलेल्या नवीन घरामध्ये राहतात. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुलोचना या घरी जेवण करत असताना घराच्या दरवाजातून दत्ताराम, अजय व अनघा वाजे या तिघांनी शिवीगाळ केली. तसेच घरामध्ये येऊन घराचा दरवाजा लावून घेत दत्ताराम याने सुलोचना यांना ओढत आणून हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काेयतीने वार करून जखमी केले. यावेळी ठार मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी