रुग्णवाहिकेवरील चालक चार महिने वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:00+5:302021-06-02T04:24:00+5:30
मंडणगड : कोरोनाच्या काळात तालुक्यातील रुग्णांच्या जीवितांचे रक्षणासाठी रुग्णवाहिका चालक दिवस-रात्र कार्यरत आहेत. मात्र, आरोग्य विभागाच्या ताब्यातील रुग्णवाहिकेवर कंत्राटी ...

रुग्णवाहिकेवरील चालक चार महिने वेतनाविना
मंडणगड : कोरोनाच्या काळात तालुक्यातील रुग्णांच्या जीवितांचे रक्षणासाठी रुग्णवाहिका चालक दिवस-रात्र कार्यरत आहेत. मात्र, आरोग्य विभागाच्या ताब्यातील रुग्णवाहिकेवर कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या एका चालकाला गेले चार महिने वेतनच मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
रुग्णालयाला भेट देणाऱ्या माजी आमदार संजय कदम यांच्याकडे ही बाब मांडण्यात आली. यावर कदम यांनी त्वरित संबंधित ठेकेदाराला फोन करून विचारणा केली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या मंडणगड तालुक्यात खासगी व सरकारी मिळून मोजक्याच रुग्णवाहिका आहेत. कोविड संसर्गाच्या काळातही तालुक्यातील रुग्णवाहिकांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या ताब्यातील दोन रुग्णवाहिकांवरच रुग्णांची ने - आण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे चालकांना आपल्या कामासाठी दिवस - रात्र सज्ज राहावे लागत आहे. त्यांच्यावरील कामाचा ताण दुपटीने वाढला असताना एका कंत्राटी चालकाला गेल्या महिन्यापासून ठेकेदाराकडून मिळणाऱ्या अल्प वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेला चालक हा कंत्राटी पध्दतीने कार्यरत असला तरी जीव धोक्यात घालून काम काम करीत आहे. सध्या पैशांअभावी उपासमारीची वेळ त्याच्यावर आली आहे.
--------------------------
मंडणगडात कार्यरत रुग्णवाहिका
खासगी - १ शासकीय - ३