मयेकर महाविद्यालयात आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:30+5:302021-04-17T04:30:30+5:30

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाइन ...

Ambedkar Jayanti celebration at Mayekar College | मयेकर महाविद्यालयात आंबेडकर जयंती साजरी

मयेकर महाविद्यालयात आंबेडकर जयंती साजरी

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाइन साजरी करण्यात आली.

या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘पशुसंवर्धन एक स्वयं रोजगारचा उत्तम पर्याय’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी पंचायत समितीचे विकास विस्तार अधिकारी डॉ.अभिजीत कसालकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्यांनी कोरोना काळात उत्तम रोजगाराचा पर्याय म्हणून पशुसंवर्धन संवर्धनसोबत विविध योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, प्रा.कविता जाधव, प्रा.विकास शिंदे, प्रा.राजेश धावडे, प्रा.निकिता जाधव, प्रा.जितेंद्र बोंबले आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हा उपक्रम संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Web Title: Ambedkar Jayanti celebration at Mayekar College