मातृमंदिर काेविड हाॅस्पिटलला माजी विद्यार्थ्यांनी दिली आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:56+5:302021-06-02T04:23:56+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथील १९८४च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून एकत्र ...

मातृमंदिर काेविड हाॅस्पिटलला माजी विद्यार्थ्यांनी दिली आर्थिक मदत
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथील १९८४च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून एकत्र येत मातृमंदिर कोविड हॉस्पिटलसाठी ३६ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांच्याकडे देण्यात आला.
या वर्गातील माजी विद्यार्थी वेगवेगळ्या भागात व्यवसाय, नोकरीनिमित्त राहात असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज संपर्कात असतात. मातृमंदिर संस्थेने कोविड हॉस्पिटल सुरू केल्याचे कळताच आणि त्यांचे मदतीचे आवाहन वाचल्यावर, देवरूखचे माजी विद्यार्थी या नात्याने त्यांनी सर्वानुमते शक्य ती मदत करावी, असे ठरवले. त्याप्रमाणे देवरूखस्थित मित्र - मैत्रिणींनी पुढाकार घेत प्रयत्न केले. त्यातून जमा झालेली रक्कम संस्थेकडे देण्यात आली.
कोरोनाच्या या कठीण काळात देवरूखसारख्या ठिकाणी ऑक्सिजन आणि आयसीयुसह सुविधा उपलब्ध केल्याबद्दल या सर्व माजी विद्यार्थ्यांनी संस्था पदाधिकारी यांना धन्यवाद दिले. यापुढे संस्थेच्या अशा उपक्रमात सोबत असल्याचे सांगितले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, देवरूखच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संस्थेला मदत करण्याचे आवाहन केले आहे.