शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटासह आता बोगद्यावरही दरडीचे संकट, रत्नागिरी-रायगड जोडणाऱ्या घाट आणि बोगदा मार्गावर वाहतूक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:24 IST

दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील कशेडी घाटात दरड उलटून काही तास होण्याआधीच घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याजवळही दोनदा दरड काेसळली आहे. चालू वर्षीच्या पावसात दुसऱ्यांदा असा प्रकार घडला असल्याने या मार्गावर आता दुहेरी संकट ओढवले आहे. दरडी हटवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे.सोमवारी सायंकाळपासूनच पावसाची संततधार कायम आहे. मध्यरात्री वादळसदृश वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस कोसळल्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास बोगद्याच्या अगदी जवळ गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली होती. ती दरड हटवण्यात आल्यानंतर दुपारी पुन्हा मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा रस्त्यावर कोसळला.सुदैवाने, ही मार्गिका आधीच बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान, केवळ कशेडी बोगद्यावरच नव्हे तर जुन्या कशेडी घाटातही दरड कोसळल्याने रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन्ही मार्गांवर दरडीचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथील घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने कशेडी बोगद्याला पर्यायी असणारा मार्गही बंद झाला आहे. परिणामी, या दोन्ही मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.दरम्यान, दरड हटवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा आणि जेसीबी मशिनरी घटनास्थळी कार्यरत आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महामार्ग प्राधिकरण या सर्वच यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

थोडक्यात घटनाक्रम

  • मंगळवारी पहाटे आणि दुपारी दोन वेळा कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली.
  • पहाटे दरड कोसळल्यामुळे संबंधित मार्गिका आधीच बंद होती; मोठी दुर्घटना टळली.
  • जुन्या कशेडी घाटातही दरड कोसळल्याने पर्यायी मार्गही ठप्प
  • वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू
  • मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता