शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राणे आले मनोमिलनही झाले, पण केसरकरांशिवाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 17:02 IST

कारण बऱ्याच वर्षानंतर राणे व केसरकर हे युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून, यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ही येणार होते.

सावंतवाडी : खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष एकत्रित आले खरे, पण सगळ्यांच्या नजरा होत्या त्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमदार नितेश राणे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येतील अशीच सर्वांना अपेक्षा होती. पण राणे आले मात्र मंत्री केसरकर हे मुंबई येथे भाऊ रुग्णालयात दाखल असल्याचे कारण देत आले नाहीत. पण त्यांचा किल्ला त्यांच्या समर्थकांनी लढवत मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले.सावंतवाडी खरेदी-विक्री संघाची निवडणूक सध्या भाजप व बाळासाहेबांची शिवसेनाविरुद्ध महाविकास आघाडी यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील पहिली सहकार क्षेत्रातील युती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत झाली आहे. या युतीच्या निमित्ताने मंत्री केसरकर व आमदार राणे हे एकत्र येत प्रचाराचा शुभारंभ करतील अशीच सगळ्यांना आशा होती. दोन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्याने कार्यकर्त्यांतमध्येही उत्साह होता.कारण बऱ्याच वर्षानंतर राणे व केसरकर हे युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून, यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ही येणार होते. आमदार राणे हे ठरल्याप्रमाणे आले खरे, पण मंत्री केसरकर हे आले नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. त्यांचा किल्ला लढवला तो त्यांच्या समर्थकांनी माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबोंसह अशोक दळवी, बबन राणे यांनी त्यामुळे दोन्ही पक्षांतील मनोमिलनावर शिक्कामोर्तब झाले. पण केसरकर आले नसल्याने त्यांची मात्र उणीव भासल्याचे दिसून येत होते.पुढील बैठकीसाठी उपस्थिती लावणार असल्याची माहितीमंत्री केसरकर हे मुंबई येथे रोजगार मेळावा असल्याने तेथे उपस्थिती लावणार होते. पण त्यांचे भाऊ आजारी असल्याने ते सध्या रुग्णालयातच येऊन जाऊन असतात. त्यामुळे सावंतवाडीतील कार्यक्रम टाळल्याचे सांगितले जात आहे. पण पुढील काही बैठकीसाठी ते निश्चित उपस्थिती लावतील, असेही त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitesh Raneनीतेश राणे Dipak Kesarkarदीपक केसरकर