शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम किसान’ची सगळी मदार कृषी सेवकांवरच; रत्नागिरीच्या कृषी विभागात स्वतंत्र मनुष्यबळ, ना तांत्रिक प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:01 IST

कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे

रत्नागिरी : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणारी ‘पंतप्रधान किसान सन्मान योजना’ असो किंवा राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेली ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग धडपडत आहे. स्वतंत्र मनुष्यबळ, तांत्रिक प्रशिक्षण व कार्यालयीन सुविधा उपलब्ध नसल्याने कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.राज्यात पीएम किसान योजना सन २०१९ पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातर्फे करण्यात आली. या योजनेचे सनियंत्रण महसूल विभागाकडे होते. मात्र, महसूल विभागाने ही योजना राबविण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही योजना कोणतेही मनुष्यबळ व सुविधा निर्माण न करता कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली.नुकतेच पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता वितरित करण्यात आला. या हप्त्यापासून वंचित राहिलेले शेतकरी हे तालुका कृषी कार्यालयातून गर्दी करू लागले आहेत. मात्र, या योजनेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ व तांत्रिक प्रशिक्षण नसल्यामुळे कृषी विभागासमोर पेच निर्माण होत आहे.पीएम किसान पोर्टलवर वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणी स्टेटसनुसार येणाऱ्या चुकांविषयी (एरर) कोणतीही तांत्रिक माहिती नसल्यामुळे व स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करता येत नाही.त्यामुळे पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, कार्यालयीन सुविधा व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. कृषी विभागाकडे योजना हस्तांतर करण्यापूर्वी पुरेसे मनुष्यबळ, सुविधा पुरविण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासनाची पूर्तता न करताच ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर कृषी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत अडचणींचे निराकरण करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.गावपातळीवर कृषी सहायकांना प्रशिक्षण, जबाबदारीचे वाटप (लँड सिडिंग, मृत लाभार्थी यादी), मदतनीस, लॅपटाॅपसारख्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यात ३६३ कृषी सहायकांची पदे मंजूर असताना अवघे १५० कृषी सहायक कार्यरत आहेत. उर्वरित पदे रिक्त आहे. त्यामुळे आधीच विविध जबाबदारी असताना ‘पीएम किसान’चा भार सोसावा लागत आहे. त्यात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची नाराजी कृषी सहायकांना सोसावी लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्रPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना