शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

सर्व टॅक्स भरले, माझ्यावर अजूनही कर्जाचा डोंगर; राजन साळवी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 16:05 IST

राजन साळवींनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मला नोटीस आली आहे.

मी कोणतीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही, त्यामुळे निश्चिंत आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची हिंमत परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक केले तरी चालेल मी घाबरत नाही, अशी स्पष्ट भूमिका राजापूरचे आमदार तथा ठाकरे सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी मांडली. 

राजन साळवींनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मला नोटीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरी ऑफिसची नोटीस आहे. तसेच चौकशीचा मोर्चा मोठे भाऊ दीपक साळवी यांच्याकडे वळवला आहे. दीपक साळवी यांना चौकशीसाठी घेऊन या अशी नोटीस आली आहे. चौकशीसाठी आम्ही हजर राहणार आहोत, असं राजन साळवींनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंध विभाग सर्व कुटुंबाला वेठीस धरत आहेत, असा आरोपही राजन साळवी यांनी केला आहे. 

माझ्या चौकशी दरम्यान ७० लोकांना नोटीस निघाल्या होत्या. माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी सर्व माहिती एसीबी कार्यालयाकडे केव्हाच दिली आहे. कुटुंबाला त्रास देणे हा त्यांचा अजेंडा दिसतो आहे. सर्व टॅक्स भरले आहेत, माझ्यावर अजूनही कर्जाचा डोंगर आहे. माझे कुटुंब माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वास मला न्याय नक्की देईल, असं राजन साळवी म्हणाले. तसेच त्रास द्यायचा, भीती दाखवायची हे कशासाठी सर्व केलं जात आहे?, असा सवालही राजन साळवी यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी