शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व फलक मराठीत लागले पाहिजेत, मंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:42 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व व्यापारी, खासगी कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालयामधील सर्व फलक मराठीत लावले पाहिजेत. २७ फेब्रुवारीला मराठी ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व व्यापारी, खासगी कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालयामधील सर्व फलक मराठीत लावले पाहिजेत. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गाैरव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्वांनी समन्वयाने मराठी फलक लावण्यासाठी काम करण्याची सूचना दिल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी मराठी भाषा विभागाच्या बैठकीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. १४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन कार्यक्रम घेण्यात येत असून, पहिला कार्यक्रम मालगुंड येथील केशवसूत स्मारक येथे हाेईल, दुसरा कार्यक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम होणार आहे. त्याबाबतच्या कार्यक्रमाची रचना करण्याची सूचना भाषा अधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.राज्य शासनाने मराठी भाषेबाबत जो अध्यादेश काढला आहे. त्याची तंतोतंत अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी केली पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व फलक मराठी भाषेमध्ये असतील असे काम करण्याच्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या आहेत. शासकीय कार्यालयांमध्येही मराठीत फलक असले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीच्या बाबतीत काही अन्यायकारक झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि अद्दल घडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती कार्यरत आहे. या समितीने काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. ९० दिवसांतून एकदा बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत