रत्नागिरी : रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न केल्याने आणि खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे विक्री परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी ही कारवाई सप्टेंबर अखेर केली आहे. तसेच पाच विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली आहे.खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ चे पालन हाेते की नाही याची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली. या तपासणीमध्ये काही विक्रेते या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले. त्यामुळे कृषी विभागाकडून खत विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.या कारवाईमध्ये चिपळूण तालुक्यातील पाच व रत्नागिरी तालुक्यातील एक मिळून सहा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच चिपळूण तालुक्यातील चार व दापोली तालुक्यातील एक मिळून पाच विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.
खत विक्रेत्यांनी रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनद्वारेच करणे आवश्यक आहे. तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील नियमाचे पालन करणेही अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. विक्री व्यवस्थेतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. - शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.
Web Summary : Six Ratnagiri fertilizer sellers' licenses suspended for not using POS machines and violating fertilizer control orders. Five others received strict warnings. Action taken by the agriculture department to ensure compliance.
Web Summary : रत्नागिरी में पॉस मशीन का उपयोग न करने और उर्वरक नियंत्रण आदेशों का उल्लंघन करने पर छह खाद विक्रेताओं के लाइसेंस निलंबित कर दिए गए। पांच अन्य को सख्त चेतावनी मिली। कृषि विभाग द्वारा अनुपालन सुनिश्चित करने के लिए कार्रवाई की गई।