शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: रामपूर सरपंच निवडणुकीत एक मत फुटल्याने हमरातुमरी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:58 IST

गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले

चिपळूण : रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर दोन गटात वादावादी झाली. या निवडणुकीत ५ विरुद्ध ४ असे मतदान होऊन सरपंचपदी अमिता अशोक चव्हाण यांची निवड झाली. गुप्त मतदान असताना विरोधी गटाचे एक मत फुटल्याचे लक्षात येताच हमरीतुमरी झाली व तणावपूर्ण वातावरण झाले. तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीत नायब तहसीलदार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लावण्यात आली होती. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. सरपंचपदाची निवडणूक तणावपूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवला होता. हे सरपंचपद खुले आहे.दोन उमेदवारांनी सरपंचदासाठी अर्ज दाखल केल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात अमिता चव्हाण यांना ९ पैकी ५ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर त्याचठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये राडा झाला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलिस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नव्हती.