शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: आठ दिवस मुक्काम करून हॉटेलचे बिल न देताच केला पोबारा, दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:21 IST

आठ दिवसांचे एकूण बिल ३४,४३५ रुपये इतके झाले हाेते

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी चिपळूण येथील हाॅटेल व्यावसायिकाचे बिल थकविल्याचा प्रकार घडलेला असतानाच दापाेलीतील हाॅटेल व्यावसायिकाच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. हाॅटेलमध्ये आठ दिवस मुक्काम करून हाॅटेलचे ३४ हजार ४३५ रुपये न देताच दाेघांनी पाेबारा केला आहे. याप्रकरणी दापाेली पाेलिस स्थानकात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रंजित सिंग आणि रुपल सिंग (दाेघेही रा. अमृतसर, पंजाब) अशी दाेघांची नावे आहेत. याबाबत भिकाजी राेंगा घडशी (५६, रा. शिवाजीनगर, दापाेली) यांनी फिर्याद दिली आहे. रंजित सिंग व रुपल सिंग हे दाेघे १ मार्च राेजी रात्री १०:३० वाजता दापाेलीतील हाॅटेल पथिक फॅमिली माळ येथे राहण्यासाठी आले हाेते. हाॅटेलमध्ये खाेली बुक करून दाेघे ८ मार्च राेजी सकाळी ७ वाजेपर्यंत वास्तव्याला हाेते. हाॅटेलमध्येच त्यांनी जेवण, नाश्ता केला. या दाेघांचे आठ दिवसांचे एकूण बिल ३४,४३५ रुपये इतके झाले हाेते.या बिलाबाबत हाॅटेल व्यावसायिक भिकाजी घडशी यांनी विचारणा केली. मात्र, बिल न देताच दाेघांनी तिथून पाेबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भिकाजी घडशी यांनी दापाेली पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास दापाेली पाेलिस करत आहेत.

फसवणुकीचा नवा फंडाहाॅटेलमध्ये वास्तव्य करून बिलाची रक्कम न देताच फसवणूक करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. रंजित सिंग व रुपल सिंग या दाेघांनी चिपळुणातील हाॅटेल अयाेध्यामध्ये वास्तव्य केले हाेते. या हाॅटेलच ७२,४४० रुपयांचे बिल न देताच दाेघे पसार झाले हाेते. आता दापाेलीतील हाॅटेल व्यावसायिकाला अशाच प्रकारे त्यांनी चुना लावला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस