शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

सोने व्यापारी खून प्रकरण: खून करून तिघेही घरी जाऊन जेवले; मध्यरात्री मृतदेहाची लावली विल्हेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 17:20 IST

कीर्तीकुमार रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याकडे १० लाखांचे दागिने होते.

रत्नागिरी : सोने व्यावसायिक कीर्तीकुमार कोठारी याचा खून करून रत्नागिरीतील तिघेही संशयित आरोपी घरी जाऊन जेवले आणि त्यानंतर मध्यरात्री आबलोलीत जाऊन मृतदेह टाकून दिला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आर्थिक व्यवहारातून हा खून केला असल्याची कबुली दिली आहे. मात्र अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूषण खेडेकर, महेश चौगुले आणि फरीद होडेकर यांनी गोखले नाका परिसरातील त्रिमूर्ती ज्वेलर्समध्येच दोरीच्या सहाय्याने कीर्तीकुमार कोठारी यांचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह ज्वेलर्समध्येच ठेवून तिघेही घरी गेले. ठरल्यानुसार मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी मृतदेह दोन गोणींमध्ये भरला. महेश चौगुले आपली रिक्षा घेऊन आला. त्या रिक्षात मृतदेह भरुन तिघेही मजगाव रोडने करबुडे, राईभातगावमार्गे आबलोली येथे गेले. तेथील नदीच्या पुलाखाली मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेतच टाकून दिला. त्यानंतर तिघेही रत्नागिरीत परतले.गुरुवारी सायंकाळी शहर पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. खून नेमका कसा केला गेला, त्याची माहिती त्यांनी भूषणकडून घेतली. हा खून कट रचून केला आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.लोकेशन मुंबईचे?स्वप्नाली सावंत यांच्या हत्येनंतर त्यांचे मोबाईल लोकेशन लांजा दाखविण्याचा प्रयत्न केले गेला. तसाच काहीसा प्रकार इथेही पुढे आला आहे. कीर्तीकुमार यांचा खून रत्नागिरीत झाला. मात्र त्यांच्या मोबाईलचे लोकेशन मुंबई आहे. भूषणने त्यांचा मोबाईल मुंबईपर्यंत कसा पोहोचविला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दहा लाखांचे दागिने गेले कुठे?कीर्तीकुमार रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याकडे १० लाखांचे दागिने होते. मात्र त्यांच्या लॉजवर त्यांचे केवळ सामानच होते. दागिने गायब असल्याने ते भूषणनेच गायब केले का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

काहीच न झाल्याचा आवमला इथे का बोलावलं आहे? माझं इथे काय काम, असे प्रश्‍न भूषणने पाेलिसांना विचारले. मात्र, पोलिसांनी त्याला सुरुवातीला कसलीच जाणीव करु दिली नाही. त्यामुळे काही वेळेपुरता भूषण बिनधास्तपणे पोलीस स्थानकात बसला होता.

नेमके कारण काय?आर्थिक व्यवहारातून भूषणने कीर्तीकुमार यांची हत्या केली असली तर त्यांच्यातील व्यवहार किती लाखांचा होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील व्यवहारातील ३५ हजार रुपये तो कीर्तीकुमार यांना देणे होता. मात्र, हे कारण हत्या करण्यासाठी पुरेसे नसल्याने आता हत्येचे मुख्य कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकांची देणी वाढली?कीर्तीकुमार यांचे ३५ हजार रुपये देणे होता. मात्र, इतरांची देणी भरपूर होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आह. ही देणी वाढत असल्यानेच त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. अर्थात पोलीस तपासात आणखी अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी