शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शिक्षक मिळाल्याने शृंगारपूर शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:42 AM

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत शृंगारपूर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पत्रकारांचे जाहीर आभार मानले.

ठळक मुद्देशिक्षक मिळाल्याने शृंगारपूर शाळा सुरूकित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी मान्य

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत शृंगारपूर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पत्रकारांचे जाहीर आभार मानले.तालुक्यातील आदर्श केंद्रशाळा, शृंगारपूर शाळेत चार शिक्षक मंजूर असताना जूनपासून फक्त दोन शिक्षिकाच कार्यरत होत्या. त्यांचीही ११ सप्टेंबरला बदली करण्यात आली होती. परंतु त्यांच्या बदली एकही शिक्षक शाळेत हजर न झाल्याने शुक्रवार तारीख १३पासून ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन केले होते.नियमाप्रमाणे दोन पदवीधर शिक्षक व दोन उपशिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत शाळा उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. प्रभारी गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी नायरी ग्रामविकास, मुंबई मंडळाचे सदस्य प्रवीण जाधव यांनी हा विषय पंचायत राज समितीचे प्रमुख व विधानसभा सचिव आठवले यांच्यासमोर ठेवला.

सर्व कागद पत्र पाहताच आठवले यांनी रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांना तत्काळ चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आंचल गोयल यांनी या शाळेवर दोन शिक्षणसेविका एक पदवीधर शिक्षक व एक उपशिक्षक यांची नेमणूक केली. ते चारही शिक्षक हजर झाल्यामुळे शृंगारपूर ग्रामस्थांनी पुकारलेले शाळा बंद आंदोलन सोमवारी मागे घेतले. गेले तीन दिवस बंद असलेली शाळा आता मंगळवारपासून पूर्ववत होणार आहे. 

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी